कोल्हापुरात कोरोनाचा सहावा बळी : संख्या ६०७

Kolhapur Coronavirus Death

कोल्हापूर : कोल्हापूरला रविवार कोरोनाने आणखी एक बळी घेत जोरदार धक्का दिला. शाहुवाडी तालुक्यातील ९० वर्षाच्या वृध्देचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हा कोरोनाव्हायरसचा सहावा बळी आहे. दरम्यान, दिवसभरात कोल्हापुरात ४५ नव्या रुग्णांची भर पडली असून एकुण आकडा ६०७ झाला. कोल्हापुरात वाढलेला रुग्ण आकडा रेड झोनमधून आलेल्यांचा आहे. सामाजिक संक्रमन होत नसल्याचा मोठा दिलासा आहे. तर आजपर्यंत सुमारे १५० लोक कोरोनामुक्त झाल्याचे समाधान आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरस च्या बाधित व्यक्तींच्या संख्येत धोकादायक पद्धतीने वाढत आहे. आज दिवसभरात ४५ नव्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील या रोगाच्या रुग्णांची संख्या या ५०६ अशी धोकादायक पातळीवर पोहोचला. काल, शनिवारी आज रात्री हेब्बाळ जर्दाळ येथील एका व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला. तर आज वृध्देचा मृत्यू झाल्याने या रोगाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या सहा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER