कोल्हापुरात कोरोनाचा सातवा बळी

Kolhapur Coronavirus Death

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील मेंढोली येथील वृध्दाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता.५) सकाळी आलेल्या स्वब तपासणी अहवालात या वृद्धाचा पॉझिटिव्ह आला होता.

मुंबई, पुणेसह, राज्यातून आलेल्यांची संख्या आजरा तालुक्यात मोठी आहे. सध्या मुंबई, पुण्याहून चाकरमानी आपल्या मूळगावी परतत असून दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे.

कोल्हापूर – जिल्ह्यात आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सहा जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ६३२ झाली झाली आहे.

आता आलेल्या अहवालापैकी पाच पुरुष, दोन महिला, एक सात वर्षाचा मुलासह तेरा वर्षाच्या एका मुलीचा समावेश आहे. हे रूग्ण कागल एक, गडिंग्लज एक, भुदरगड 2, शाहूवाडी 3 येथील आहेत. तर 400 हून अधिक लोक कोरोना मुक्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER