कोरोनाची दुसरी लाट : मुंबई महापालिका अलर्ट मोडवर

Mumbai Municipal Corporation - Corona

मुंबई :- हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील असं बोललं जात होतं. अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचेही पाहायला मिळाले. भारतातही कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. नुकतीच राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आलेली पाहायला मिळत आहे. तर मुंबईतसुद्धा दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या आता हळूहळू वाढायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) महापालिका अलर्ट मोडवर आली आहे.

मुंबईतही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मार्च महिन्यातला सर्वांत कमी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा दिवाळीनंतर पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी ११ नोव्हेंबरला चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७.८३ टक्के होतं. मात्र दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाधित रुग्णांचं प्रमाण १०.६३ टक्क्यांवर गेलं. तसेच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ नोव्हेंबरला दिवाळीनंतर मार्च महिन्यापासून आतापर्यंतच्या सर्वाधिक १७,२६० कोविड चाचण्या झाल्या आहेत. त्यात १०१८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

मुंबईतील नागरिकांशी तुलनेने अधिक संपर्क येणाऱ्या व्यावसायिकांची कोविड वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात-हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक इत्यादींची कोविड चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता दुसरी लाट येण्याआधी ती परतून लावण्याची तयारी सुरू केली आहे.

ही बातमी पण वाचा : एकीकडे शाळा सुरू होण्याच्या मार्गावर तर, दुसरीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, रोहित पवारांनी दिला मोलाचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER