कोरोनाचा धोका वाढला, NEET-PGची परीक्षा देखील पुढे ढकलली

NEET Exam Postponed

नवी दिल्ली :- देशभरात करोनाचा धोका अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतंच केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, आता नीट पीजी- २०२१ परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नीट पीजी- २०२१ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. असं ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : अखेर वैद्यकीय परीक्षाही लांबणीवर; अमित देशमुखांचा निर्णय; सुप्रिया सुळेंनी मानले आभार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button