ब्रिटनमध्ये आढळला करोनाचा नवा ‘स्टेन’; अनेक देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित

Corona & British Airlines

लंडन : ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आहे. यासंदर्भात नवी धक्कादायक माहिती अशी आहे की हा कोरोनाचा नवा विष्णू आहे. करोनाच्या या नव्या विषाणूमुळेच ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये पुन्हा करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. खबरदारी म्हणून लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. नेदरलँड्स आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

दरम्यान, जर्मन सरकारनं ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत जाणाऱ्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून रविवारी याबाबत माहिती देण्यात आली. करोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता बेल्जिअम आणि नेदरलँडने यापूर्वीच ब्रिटनच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.

सध्या ब्रिटन घेत असलेल्या प्रत्येक निर्णयावर आमचे लक्ष आहे. करोना विषाणूच्या नव्या ‘स्ट्रेन’शी निगडीत सूचनांचा आणखी डेटा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर्मनी इतर युरोपीय देशांच्याही संपर्कात आहे. सध्या जर्मनीत नव्या स्टेनचा कोणताही रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि साऊथईस्ट इंग्लंडच्या सर्व भागांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी मूळ करोना विषाणूपेक्षा अधिक जास्त वेगानं पसरणारा स्ट्रेन सापडल्याची माहिती आहे. बेल्जिअमच्या निर्णयानंतर विमानसेवेसोबतच युरोस्टार ट्रेन सेवांचे संचालनदेखील प्रभावित होणार आहे. युरोपिय देशांनी ख्रिसमस आणि नववर्षांच्या पूर्वीच हे पाऊल उचलले आहे. या कालावधीत अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जात असतात. गेल्या वर्षी याच कालावधीत करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास सुरूवात झाली होती. इटली, फ्रान्स, ब्रिटनमध्ये सुरूवातीला मोठ्या प्रमाणात या विषाणूचा प्रसार झाला होता. त्यामुळे यावेळी या देशांकडून आधीपासूनच खबरदारी बाळगण्यात येते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER