उद्या जाहिर होणार कोरोनाची नवीन नियमावली, निर्बंध कडक होणार की …

Uddhav Thackeray & Corona

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने उपाययोजनांचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज तातडीने बैठक घेतली. बैठकीत महाराष्ट्रात कोरोनाला आवरण्यासाठी कडक निर्बंध लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आणि राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

जिल्हा आणि विभागनिहाय आढावा घेतला. नागरिकांच्या बेजबाबदारपणाबाबतही सरकारने काळजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहेत. जिथे परिस्थिती फार गंभीर आहे, तिथे कर्फ्यू लावण्याचाही सरकारचा विचार आहे. उद्या दुपारपर्यंत राज्यातील कोरोनासंबंधी नवीन नियमावली जारी केली होणार आहे.

राज्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं मुंबई, पुणे, ठाणे नागपुरात आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत आता रात्रीची संचारबंदी लागू होणार की नाही, याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे.

पुण्यामध्ये लॉकडाऊन (Lockdown) होणार की नाही याबाबत २ एप्रिलच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ‘लॉकडाऊन करण्याची अजिबात इच्छा नाही मात्र दुसरी लाट थांबवायची तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, असंही अजित पवार म्हणाले. लॉकडाऊन लागू करायचा की नाही याबाबत पुढच्या शुक्रवारी निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER