भारत बायोटेकने बनवली कोरोनाची ‘नेझल’ लस

Corona's 'nasal' vaccine made by Bharat Biotech

हैदराबाद : कोरोनाच्या लसीबाबत (Corona Vaccine) भारताने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. भारत बायोटेक  ( Bharat Biotech) कंपनीने ‘नेझल स्प्रे’ लसीसाठी ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ला निवेदन दिले आहे. चाचणीदरम्यान या नेझल स्प्रेचे चांगले परिणाम आढळले तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत यश मिळू शकते. ही लस नाकाद्वारे दिली जाणार आहे व ती इंजेक्शच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकते! भारत बायोटेकनं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीसोबत ही नेझल स्प्रे लस तयार केली आहे. भारतात या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला या लसीची चाचणी, भुवनेश्वर, पुणे आणि हैदराबादमध्ये केली जाणार आहे. १८ ते ६५ वयाच्या स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. त्याआधी चाचण्या केल्या जाणार आहेत.

नेझल लस?
जगात आतापर्यंत बाजारात आलेल्या कोरोनावरील लसी इंजेक्शन स्वरूपात आहेत. नेझल लस ही नाकात देण्यात येईल. कारण कोरोना व्हायरस सर्वाधिक नाकावाटेच पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जाणारी लस अधिक परिणामकारक ठरू शकते असा अंदाज आहे. वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनानुसार नाकावाटे लस दिली गेल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली विकसित होते. नाकात कोणत्याही संसर्गजन्य विषाणूचा प्रवेश यातून रोखता येऊ शकतो.

इंजेक्शनच्या तुलनेत जास्त प्रभावी ?
‘नेझल स्प्रे’सारख्या लसीला मान्यता मिळाली तर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हे पाऊल मोठे क्रांतिकारक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, इंजेक्शनमुळे मानवाचे संपूर्ण शरीर सुरक्षित होते, असे ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पण नाकावाटे स्प्रेने लस दिली गेल्यास ती चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला सुरक्षित ठेवण्यासासाठी उपयोगी ठरू शकेल, असे तज्ज्ञांना वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER