कोल्हापुरात कोरोनाचे मीटर फास्टच

Coronavirus

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे मीटर फास्ट सुरू आहे. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. दुपारी ३० रुग्ण सापडले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यात आणखी १७ रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४८३ वर पोहोचली आहे. कालपर्यंत रुग्णांची संख्या ४३६ होती. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे कोल्हापूरकरांचा ठोका चुकत आहे.

यातही दिलासादायक बाब म्हणजे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. ही दिलासादायक बाब आहे. गुरुवारी दिवसभरात ४९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले.यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ९१ वर गेला आहे.

राधानगरी तालुक्यात आज ५ वाजेपर्यंत आणखी आठ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात फेजिवडे तीन, आटेगाव, कंदलगाव, आमजाई व्हरवडे, मांडरेवाडी व मोघडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.आजअखेर तालुक्यात ५८ रुग्ण सापडले आहेत.

चंदगडमध्ये आज आणखी ६ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. चंदगडमधील रुग्णांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे. शाहूवाडी तालुक्यात नवीन सहा कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तालुका दीडशेच्या वर गेला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER