कोरोनाच्या संसर्गामुळे लोटेतील घरडा कंपनीचे उत्पादन तात्पुरते थांबवले

कोरोनाच्या संसर्गामुळे लोटेतील घरडा कंपनीचे उत्पादन तात्पुरते थांबवले

रत्नागिरी(प्रतिनिधी): लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीतील २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने खबरदारीसाठी प्रशासनाने घरडा कंपनीचे उत्पादन तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एकाचवेळी हा प्लांट बंद होणार नसल्याने काही कर्मचाऱ्यांना ठेवून हळूहळू उत्पादन बंद करण्यात येणार आहे. कर्मचारी वसाहतही कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह अनेकांनी कंपनी बंद करण्याची मागणी केली होती. आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याची सूचना केली होती.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कारखाना तूर्तास काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाकडून तीन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. आज मात्र केमिकल कारखाना काही कालावधीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, असे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER