राज्यात कोरोनाचा कहर वाढला; आज ३९ हजार ५४४ नवे रुग्ण, तर २२७ जणांचा मृत्यू

Corona Updates

मुंबई :- राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. दोन दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजारांनी खाली आला होता. मात्र आता एकाच दिवशी कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत १२ हजारांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३९ हजार ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षात प्रथमच एका दिवसात इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत २३ हजार ६०० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा एकूण आकडा २४ लाखांच्या पुढे गेला. राज्यात आतापर्यंत २८ लाख १२ हजार ९८० जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ५४ हजार ६४९ जण दगावले आहेत. तर सध्याच्या घडीला ३ लाख ५६ हजार २४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button