राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात ९९ रूग्णांचा मृत्यू, ३० हजार ५३५ नवे करोनाबाधित

Corona Virus - Maharastra Today

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने आपले डोके वर काढले आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. आज तर नव्या कोरोनाबाधित रुग्णांनी ३० हजारांच्या वरची संख्या पार केली. आज दिवसभरात राज्यात ९९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ३० हजार ५३५ नवीन करोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. राज्यातील मृत्यू दर २.१५ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३९९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाख १० हजार १२० ॲक्टिव्ह रूग्ण आहेत.

आज ११ हजार ३१४ करोनातून बरे झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.३२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

मुंबईत मागील २४ तासांत ३ हजार ७७५ नवीन करोनाबाधित वाढले, दहा रूग्णांचा मृत्यू झाला. तर, १ हजार ६४७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ६२ हजार ६५४ झाली आहे. आतापर्यंत ३ लाख २६ हजार ७०८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत ११ हजार ५८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ४४८ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER