पुण्यात कोरोनाचा कहर, शरद पवारांनी घेतली शाळा; उद्या वृत्तपत्रांच्या संपादकांसोबत बैठक

Sharad Pawar

मुंबई : पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांच्या मृत्यूनंतर  पुण्यातील आरोग्यव्यवस्थेचा गलथानपणा समोर आला आहे. शिवाय पुण्यात राष्ट्रवादीची (NCP) सत्ता. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) सरकारमधील मुख्य दुवा. असे असतानाही पुण्यात कोरोनाची (Corona) स्थिती बिघडल्याचे पाहून विरोधी पक्षानेही हीच संधी हेरली आहे.

तर, शरद पवार यांनीही पुण्यातील कोरोनाच्या स्थितीवर गांभीर्याने लक्ष केंद्रित करत पुण्यातील अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली व त्यांची कानउघाडणी केली. शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा यावरून पवारांनी अधिका-यांना चांगलेच खडसावले. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या का वाढतेय? असा शरद पवार यांनी जाब विचारला.

पत्रकार मृत्युप्रकरण, त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरबाबत का त्रुटी आहेत, याबाबतही विचारणा केली आणि सूचना केल्या. बारामती हॉस्टेलवर झालेल्या या बैठकीला केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. शरद पवार यांनी पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची तातडीनं बैठक बोलावली व कोरोनाबाबत पुण्यात स्थिती का बिघडतेय हे जाणून घेतले. यावर आयुक्त सौरभ राव म्हणाले, देशात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात असली तरी घाबरून जायचं कारण नाही; कारण कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. चाचण्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे.

त्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी उद्या तब्बल चार बैठका बोलावल्या आहेत. बैठकीत कोरोनाबाबत काय चुकतंय, काय रणनीती असावी यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तसेच, विविध वृत्तपत्रांच्या वरिष्ठ संपादकांसोबतही शरद पवार बैठक घेणार आहेत असे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER