पुण्यात कोरोनाचा कहर : शरद पवारांच्या आज बैठकांवर बैठका, अधिकाऱ्यांना कडक सूचना

पुणे : पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू आणि माजी अधिका-याचा कोरोनाने मृत्यू या दोन्ही घटनांनंतर पुण्याच्या आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे झाले. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारमधील महत्त्वाचे नेते पुण्याचे पालकमंत्री असताना पुण्याच्या आरोग्यव्यवस्थेचे असे धिंडवडे निघत असताना पाहून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार स्वतः मैदानात उतरले व आज त्यांनी पुण्यात बैठकांवर बैठका घेत संबंधित अधिका-यांना कडक सूचना केल्या आहेत. शरद पवार म्हणाले, कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. बरेच नागरिक मास्कशिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे.

मास्कशिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा.पवार म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर  भर द्यावा. खासदार शरद पवार म्हणाले, मॉल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोठी दुकाने या ठिकाणच्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER