कोरोनाने निधन झालेला उमेदवार मतमोजणीत आघाडीवर

Kajal Sinha

कोलकाता :- कोरोनाने निधन झालेले तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा (Kajal Sinha) यांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कलामध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. काजल सिन्हा यांना पश्चिम खरदाहा मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आहे.

मतदानानंतर तीनच दिवसात निधन

खरदाहा (Khardaha) विधानसभा मतदारसंघ हा याआधीही तृणमूल काँग्रेसकडे होता. अमित मिश्रा इथले आमदार होते. यावेळी तृणमूलने काजल सिन्हा यांना येथून तिकीट दिले. सहाव्या टप्प्यात (22 एप्रिलला) खरदाहा येथे मतदान झाले. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात (२५ एप्रिलला) कोरोनाच्या उपचारादरम्यान काजल सिन्हा यांचे निधन झाले.

पत्नीची पोलिसात तक्रार
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चार उमेदवारांचा दहा दिवसांच्या काळात कोरोनाने मृत्यू झाला. काजल सिन्हा यांच्या निधनानंतर पत्नी नंदिता सिन्हा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माझ्या पतीचा मृत्यू निवडणूक उपायुक्त सुदीप जैन आणि इतर अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा सदोष मनुष्यवध असल्याचा आरोप नंदिता यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button