कोरोनाची चिंता वाढली; आज राज्यात १६६ मृत्यू , तर ३५ हजार ७२६ नवे करोनाबाधित वाढले

Coronavirus Maharashtra

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घालायला सुरूवात केली आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत आहेत व रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आता करोना प्रतिबंधात्मक नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी करत आहे. शिवाय, आजपासून राज्यात रात्रीची जमावबंदी देखील घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय काल घेतला आहे. दरम्यान आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ३५ हजार ७२६ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज १४ हजार ५२३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.५८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER