कोरोना : लस देण्याबाबत ‘मॅसेज’ मिळेल – राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई :- नागरिकांना कोरोनाची (Corona) लस देण्याबाबत केंद्र सरकार ‘मायक्रो प्लॅनिंग’ करत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक, इतर आजार असलेले ५० वर्षांखालील असा डेटा तयार करणे सुरू आहे. यातून यादी तयार करण्यात येईल व लस देण्याबाबत संबंधितांना, लस देण्याची तारीख ‘मॅसेज’ पाठवून कळवली जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Health Minister Rajesh Tope explained detail planning about corona vaccine distribution)

यासाठी १८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. ज्या व्यक्तीला ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मॅसेज मिळेल, त्याची ओळख पटल्यावर लस देणार, असे टोपे म्हणाले.

उत्तर प्रदेशात यासाठी मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द केल्या. पण आपल्याला तसे काही करायची गरज नाही. मनुष्यबळ उपलब्ध आहे. गरज पडली तरच सुट्टी रद्द होईल. लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी काम राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करत आहोत.

लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केले आहे. साधारण दोन कंपन्या ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. निर्णय केंद्राला घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER