कोरोनाची चिंता वाढली, आज राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल २८ हजार ६९९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा कसा घालायचा? या प्रश्नावर राज्य सरकार आणि प्रशासन उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

आज दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे करोना पुन्हा एकदा राज्यात उग्र रुप धारण करतोय की काय, अशी भिती आता आरोग्य यंत्रणांना वाटू लागली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मंगळवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे एकूण २८ हजार ६९९ नव्या करोनाबाधितांची भर देखील पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा आता २५ लाख ३३ हजार ०२६ इतका झाला आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार ६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे राज्यात आजपर्यंत ५३ हजार ५८९ मृत्यू झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER