कोरोनामुळे तूर्त महाविद्यालये सुरू होणार नाहीत : उदय सामंत

Uday Samant

कोल्हापूर : राज्यभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असला तरी, संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज स्पष्ट केलं. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे. याचा कशा पद्धतीने नियम असावा, याबाबत येत्या  आठ दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. सीमा भागातील शिनोळी या गावात दहा एकर जागा आहे. त्या ठिकाणी लवकरच शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी विविध अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असताना संस्थाचालक विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी घेत असतील तर, अशा संस्थाचालकांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार दाखल करावी. अशा संस्थांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER