“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?” नितेश राणेंचा ठाकरे सरकारला टोमणा

CM Uddhav Thackeray - MPSC - Nitesh Rane

मुंबई :- “फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना (Corona) होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?” असा टोमणा मारत भाजपाचे (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर टीका केली.

एमपीएससीच्या परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, ‘बंद करा बंद करा, एमपीएससीचे गाजर दाखवणे बंद करा’ घोषणा देत आंदोलन केले.

ही बातमी पण वाचा : MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

१४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून अनेकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

याबाबत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका करताना ट्विट केले – “MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही??”

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ‘नाईट लाईफ’चे समर्थक आहेत त्यामुळे राणे यांनी ट्विटमध्ये रात्रीच्या पार्टींचा उल्लेख केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER