कोरोनामुळे सलमान खान साधेपणाने साजरा करणार वाढदिवस

Salman Khan

27 डिसेंबर रोजी सलमान खानचा (Salman Khan) वाढदिवस असतो. प्रत्येक वर्षी तो त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर मोठ्या भव्य प्रमाणावर वाढदिवस साजरा करतो. त्याच्या वाढदिवसाला बॉलिवुडमधील (Bollywood) सर्व कलाकार उपस्थित असतात आणि तीन-चार दिवस वाढदिवस आणि नवीन वर्षाची पार्टी केली जाते. परंतु यंदा कोरोनामुळे (Coronavirus) वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सलमान खानने घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा ड्रायव्हर आणि त्याच्या स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर सलमानने त्याच्या घरातील सगळ्यांची कोरोना टेस्ट केली होती. सुदैवाने सगळ्यांचीच कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. तरीही सलमान खानने स्वतःला क्वारंटाइन केले होते. सलमानचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी तो कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्याच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस 20 नोव्हेंबर रोजी असतो. आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने घरगुती स्वरुपात साजरा करण्यात आला आणि आता त्याने वाढदिवसाची पार्टी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER