कोरोनामुळे विस्कळीत मोसमाची राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंना भरपाई मिळणार

Cricket

कोरोनामुळे (Corona) विस्कळीत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अधिकाधिक क्रिकेट स्पर्धा येत्या फेब्रुवारी ते मे दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. त्याची सुरुवात जानेवारीत सैयद मुश्ताक अली ट्रॉफीपासून होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) (BCCI) च्या वार्षीक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच कोरोनामुळे खंडीत झालेल्या क्रिकेट मोसमासाठी संबंधित क्रिकेटपटू व अधिकाऱ्यांसाठी योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसचे (Congress) नेते राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांची मंडळाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते उत्तराखंडच्या माहिम वर्माची जागा घेतील. आयपीएल संचालन मंडळावर ब्रिजेश पटेल व खैरुल मुजूमदार यांची नियुक्ती कायम आहे तर क्रिकेटपटूंच्या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून प्रज्ञान ओझा याची नियुक्ती झाली आहे. आयसीसीवर संचालक म्हणून सौरव गागुली कायम असतील तर जय शहा हे आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीवर भारताचे प्रतिनिधी असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER