कोरोना गेला खड्यात! एफआरपी आणि वीज बिलमाफीबाबत राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti

सांगली :- उसाच्या एफआरपीची थकबाकी आणि वीज बिलात सूट मिळणे या मुद्द्यावर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते म्हणालेत, कोरोना (Corona) गेला खड्यात आधी एफआरपीचे पैसे आणि वीज बिळात सूट द्या.

मंत्र्यांची दालन सजवायला आहेत पैसे

सरकारला मंत्र्याची दालन सजवायला पैसे आहेत आणि वीज ग्राहकाची वीज बिल माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. यासाठी आम्हाला आता रस्स्यावर उतरवावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. विधिमंडळाचे अधिवेशन हे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याघराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरुन गाजले. महाराष्ट्रात दुसरे कोणी राहत नाही का? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, वाढीव वीजबिल हे सर्व प्रश्न बाजूला राहिले, अशी टीका शेट्टी यांनी केली.

वीज बिल प्रश्नी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन

लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही आमची आजही ठाम मागणी आहे. १९ मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितलं. १९ मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारबाबत नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असे ही राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER