कोरोना मुक्तीसाठी कोरोना कचऱ्याची विल्हेवाटही योग्य करणं गरजेचं आहे!

Maharashtra Today

कोरोना (Corona) विषाणू वैद्यकिय तज्ञांसाठी आणि डॉक्टरांसाठी मोठा आव्हान ठरतोय. कोरोनाची दुसरी लाट(Second Wave) त्सुनामीत बदलली आहे. यावर उपाय करण्यासाठी शक्यत्या सर्वच स्तरातून युद्ध पातळीवर काम होताना आपल्याला दिसतंय.वेगवेगळ्या आव्हांनाना तोंड देत डॉक्टर्स कोरोनाशी लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला व्हिएतनाम, न्यूझिलंड, इस्त्राइल या देशांनी कोरोनाला हद्दपार केलंय. भारताला हे शक्य होईल का? अशा चर्चा सुरु असताना कोरोना मुक्त भारतासाठी सर्वात महत्त्वाची बाब अधोरेखित होते आहे. ती म्हणजे ‘कचरा व्यवस्थापन’ (Waste Management) या गोष्टीची.

कोरोनामुळं जगभरातील देशांना त्यांच्या जीवनशैलीत महत्त्वपुर्ण बदल करावे लागले. देशभरातील विविध देशांना याचा मोठा तडाखा बसला. अर्थव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं. काही देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांनी आरोग्य विषयक बाबींचा विकास केला नाही त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. कोरोनाच्या रोजच्या फैलावाला रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. भारतात सध्या कोरोनाग्रस्तांवरील रुग्णांच्या उपचाराला प्राधान्य दिलं जातंय, ते गरजेचं ही आहे; पण दिर्घकालीन लढ्यासाठी मोठे बदल स्वीकारावे लागणार असल्याचं बोललं जातंय.

कोरोना विषाणूचा प्रसार पाहता मागच्या वर्षी २४ मार्चला, संयुक्त राष्ट्राच्या ‘पर्यावरण कार्यक्रम’अंतर्गत जगभरातील सरकारांना कोरोनासंबंधित कचऱ्याचं व्यवस्थापन सावधानीने करण्याचं अवाहन केलं होतं. आरोग्याला घातक ठरणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसं करायचं या विषयी १९९२ चा ‘बेसल करार’ डोळ्यासमोर ठेऊन संयुक्त राष्टांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. या करारावर सही करणाऱ्या जगभरातील इतर राष्ट्रांप्रमाणे भारताची सामावेश यात आहे. घातक कचरा नष्ट करण्यासाठी कठोर पावलं उचलावी लागणार आहेत.

गटारींच्या अधुनिकीकरणाची गरजेचं

आरोग्य विषयक तज्ञांच मत आहे की, कोरोनाच्या प्रसारासाठी खराब गटारी प्रभावी ठरु शकतात, ‘केंद्रिय प्रदुषण नियंत्रण बोर्ड’ने २०१५ साली दिलेल्या आकडेवारीनूसार देशभरातल्या गटारींमधून जवळपास ६ लाख १९ हजार ४८० लीटर पाणी रोज निघतं. पैकी फक्त २ लाख ३२ हजार ७७० लिटर पाण्याला शुद्ध करण्याची क्षमता भारताकडे आहे, म्हणजे गटारातून वाहणाऱ्या फक्त ३७ टक्के पाण्याला शुद्ध करता येणं शक्य होतं. म्हणून कंटेमेन्ट झोन आणि क्वारंटाइन केंद्रातून निघणाऱ्या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.

बायोमेडीकल कचरा

चीनच्या वुहान शहरातील कोरोना विषाणूशी लढण्यासाठी फक्त दवाखाने उभारले नाहीत तर त्या दवाखान्यांमधील औषधांचा कचरा संपवण्यासाठी ‘विशेष कोव्हिड कचरा प्रबंधन संयत्र’ बसवले. या संयंत्रासोबतच इतर ४६ अस्थाई कचरा नष्ट करणारे केंद्र बनवण्यात आले. यामुळं वुहान शहरातील कोरोना विषाणूमुळं इतर दिवसांच्या तुलनेत ६०० टक्के जास्त मेडीकल कचरा निर्माण होत होता. तो संपायला मदत झाली.

कंटेमेन्ट झोन आणि क्वारंटाइन केंद्रतील कचऱ्यासोबत कोव्हिड १९च्या रुग्णांचा उपचार करणाऱ्या दवाखान्यांमधून निघलेल्या कचऱ्याला नष्ट करणं सर्वात जास्त महत्त्वाच असतं. या कचऱ्यात रुग्णांची विष्ठा, मुत्र, थुंकी, औषधं, वापरुन फेकलेले मास्क, हातमोजे, पी.पी.ई. किट इत्यादींचा सामावेश होतो. हा सर्व कचरा महामारीच्या जास्तीच्या प्रसाराला कारणीभूत ठरु शकतो. कोव्हिड १९च्या विरोधात लढल्या जाणाऱ्या युद्धाला अधिक कमजोर करु शकतो. आकडेवारीनूसार २०१७ पर्यंत भारतात उत्पन्न होणाऱ्या बायोमेडीकल कचऱ्यापैकी ७८ टक्के कचरा व्यवस्थित नष्ट केला जात होता उरलेला २२ टक्के कचरा जमिनीत गाढला जायचा. कोरोनाच्या स्फोटानंतर हा कचरा उघड्यावर टाकण्याचा किंवा जमिनीत पुरवण्याचं प्रमाण वाढलंय, ज्यामुळं येत्या काळात कोरोनाच प्रसार वाढू शकतो.

कोव्हिड १९ कचऱ्याचा प्रतिबंध

कोव्हिडच्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्रिय प्रदुषण नियंत्रण बोर्डानं मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानूसार

* कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवण्यात आलेल्या दवाखन्यांमधील कचरा उचलण्यासाठी दोन पिशव्यांचा वापर करण्यात यावा

* कोरोनाचा कचरा नष्ट करण्यासाठी ‘कॉमन बायो मेडीकल वेस्ट ट्रिटमेंट फॅसिलिटी’ (CBWTF) ला पाठवताना त्याच्यावर कोव्हिड-१९ असं स्टिकर लावण्यात यावं.

* विविध राज्यात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना विषयक शिबिरांची माहिती प्रादेशिक प्रदुषण नियंत्रण मंडळांना पाठवण्यात यावी. कोरोना विषय़क कचरा नेण्यासाठी वेगळ्या वाहणांचा वापर करायला हवा. कचऱ्याच्या शुद्धीकरणासाठी १ टक्के हाइपोक्लोराईट विलयनचा वापर गरजेचा आहे.

या शिवाय क्वारंटाइन केलेल्या घरातील कचरा काढून तो संपवण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. कोरोना रुग्णांसबंधित कचरा सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन त्याची विल्हेवाट लावण्यात यावी. कचरा उचणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावणंही महत्त्वाचं आहे. अशा सर्व गोष्टी कोरोनासंबंधी कचरा उचलताना ध्यानात घेणं गरजेचं असलं तरी याची अंमलबजावणी कितपत होते यातच देश कोरोनामुक्त होईल का? या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button