कोरोना योद्ध्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य; मोदी सरकारची घोषणा

PM_Narendra_Modi

नवी दिल्ली :- देशात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे, ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटानंतर देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. NEET-PG परीक्षा कमीत कमी चार महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाला हरवण्यासाठी सतत बैठक घेत आहेत. तसेच संकटाला तोंड देण्यासाठी कठोर निर्णयांची अंमलबजावणीही करत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केले पाहिजे.” त्याचबरोबर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.

नुकतेच, हृदयरोग सर्जन डॉ. देवी शेट्टी यांचे एक विधान समोर आले होते. ते म्हणाले की, “ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारिकांवर येणार आहे. त्यांची कमतरता भासू शकते. कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणे कठीण होईल.”

पंतप्रधानांचे महत्त्वाचे निर्णय
१. वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.
२. ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. याव्यतिरिक्त रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.
३. कोरोनाविरुद्ध १०० दिवसांच्या सेवेसाठी तयार आणि सर्व कोरोना वॉरियर्सना पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘कोरोना राष्ट्रीय सेवा पुरस्कार’ भारत सरकारच्यावतीने देण्यात येईल.
४. पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच तयार होईपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button