७ महिन्यांपासून कोरोना योध्ये पगारापासून वंचित, राज्यपालांना पाठवले रक्ताने लिहलेले पत्र

Maharashtara Today

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील ७ महिन्यांपासून चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. मात्र मागणीची कोणीच दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांना रक्ताने पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

मागील कामगारांना गेल्या ११ महिन्यापासून वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील १२ महिन्यापासून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नाही. कत्राटदार नसतांना कंत्राटी कामगारांकडून करोना आपत्तीमध्ये कामे करवून घेण्यात आली. मात्र कंत्राटदार नसल्यामुळे कामगारांचे पगार कोणाच्या मार्फत द्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे कामगारांचे ७ महिन्यांचे पगार थकीत आहेत. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ५६२ कंत्राटी पदासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या १२ महिन्यानंतर नवीन कंत्राटदाराला कामाचा आदेश देताना निविदेतील ३५५ कंत्राटी पदे कोणतेही ठोस कारण नसताना कमी करण्यात आली. फक्त २०७ पदासाठी कंत्राटदाराला काम देण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कामगारांवर उपासमारीसोबतच बेरोजगारीची टांगती तलवारही आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहचविण्यासाठी भ्रष्टाचार केला.त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कंत्राटादाराची नेमणूक करण्यास विलंब झाला, असा कामगारांचा आरोप आहे. ७ महिन्यांचा थकीत पगार, किमान वेतन व हक्काचा रोजगार या मागण्यांसाठी डेरा आंदोलनातील शेकडो कामगारांच्या रक्ताने पत्र लिहून व सह्या करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठविण्यात आले.

कामागारांनी आपल्या व्यथा मांडताना, ‘११ महिन्यापांसून पगार नाही, जगायचे कसे? आम्ही आत्महत्या करायची का? असा संतप्त सवाल करत आमच्या जीवाचे कमी जास्त झाल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. लहाने व अधिष्ठीता वैद्यकीय महाविद्यालय यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे तसेच ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करवे ही विनंती’ असे राज्यपाल यांना रक्तांने लिहून पत्र पाठविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button