कोरोना : इटलीत रविवारी १३३ रुग्णाचा मृत्यू

Corona virus-133 patients die in Italy

इटली येथे कोरोनाचा हैदोस प्रचंड वाढला आहे. रविवार, ८ मार्च या एका दिवशी कोरोनाच्या १३३ रुग्णांचा मृत्यू झाला. इटलीत आतापर्यंत कोरोनामुळे ३६६ लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे.

इटलीच्या सिविल प्रोटेक्शन एजन्सीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत एक दिवसात २५ टक्के वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या ५८८३ वरून ७३७५ झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने रविवारी कठोर पावले उचलली आहेत. जनता या सूचनांचे काटेकोर पालन करते आहे. लॉमबार्डी आणि इतर १४ प्रांतांतील सुमारे १.६ कोटी लोकांच्या राज्यातून बाहेर जाण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यांना राज्याच्या बाहेर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल.

पंतप्रधान जुजेप्पे कोंटे यांनी गर्दीची ठिकाणे शाळा, जिम, संग्रहालय, नाईट क्लब अशी ठिकाणे ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. इटलीमधील कोरोनाची लागण वाढल्यानंतर, कोरोनाच्या रुग्णांची संख्या चीननंतर जगात इटलीत सर्वाधिक ७३७५ आहे. दक्षिण कोरियात कोरोनाचे ७३१३ रुग्ण आदळले आहेत.

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही