योगी आदित्यनाथ इन ऍक्शन मोड; दहा दिवसांत ११ ठिकाणी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

लखनऊ : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crises) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांचे मृत्यूही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या उद्रेकामुळे लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा तुटवडा आहे. उत्तर प्रदेशातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण बरे झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दहा दिवसांत ११ ठिकाणी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरे आणि जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यूपीमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच, अनेक ठिकाणी सुविधा, ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांचा ऍक्शन मोड पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता कोरोनामुक्त झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी योगी थेट गावांना भेटी देत आहेत. त्यांनी गेल्या १० दिवसांत ११ जिल्ह्यांना भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे. ग्राऊंड रिपोर्टचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ दौरे करत असल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button