कोरोना : मुंबईत आणखी दोन पोलिसांचा मृत्यू

मुंबई : नवी मुंबईत कोरोनामुळे (Corona virus) सोमवारी विनोद पासटकर (४६) आणि शांतिलाल कोळी (५५) या दोन पोलिसांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात २२४ पोलिसांचा मृत्यू (Policemen dies) झाला आहे.

कॉन्स्टेबल विनोद पासटकर हे बेलापूरच्या पोलीस मुख्यालयात तर शांतिलाल कोळी एनआरआय पोलीस स्टेशन येथे सहायक उपनिरीक्षक होते.

कोरोनाचे निदान झाल्यानंतर विनोद यांना ७ सप्टेंबर रोजी डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची तब्येत ढासळली. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले; पण फायदा झाला नाही. त्यांचे निधन झाले.

शांतिलाल यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू होते. फायदा झाला नाही. त्यांचेही निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER