‘कोरोना’ खवल्यामांजर खाणाऱ्यामुळे झाला; चीनच्या संशोधकांचा दावा

corona-virus

मुंबई : जगभरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजणाऱ्या ‘कोरोना’चा विषाणू खवल्यामांजर (पँगोलिन) खाणाऱ्यांमुळे पसरला असा दावा चीनच्या संशोधकांनी केला आहे. कोरोनाचा विषाणू कुठून आला असावा यावर जगभरात संशोधन सुरू आहे. काही प्राथमिक तर्क लावले जात आहेत. कोरोनाची साथ चीनमधून सुरू झाली आणि जगभरात पसरली. त्यामुळे चीनच्या संशोधकांचा दावा विचारणीय ठरतो. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, आधी कोरोनाचा विषाणू वटवाघुळामुळे पसरतो असे म्हटले होते; पण आता चीनच्या संशोधकांनी – हा विषाणू खवल्यामांजरामुळे माणसाच्या शरीरात शिरला आणि पसरला, असे म्हटले आहे. खवल्यामांजर (पँगोलिन) ही प्राण्याची प्रजाती अतिशय दुर्मीळ आहे.

हा स्तनधारी वन्यजीव इतर स्तनधारी वन्यजीवांपेक्षा एकदम वेगळा दिसतो; त्याचा आकारही वेगळा असतो. त्याच्या शरीरावर खजुराच्या झाडावर असणाऱ्या खवल्यांप्रमाणे दिसणारे टणक कवच असते. तो दुरून लहान डायनासोरसारखा दिसतो. तो किड्यामुंग्या खातो. चीनच्या संशोधकांनी म्हटले आहे की, खवल्यामांजर खाणाऱ्या कोणत्या तरी माणसाला त्या प्राण्यातून कोरोनाची लागण झाली व त्या रुग्णाकडून तो पसरत गेला. या नव्या दाव्यानंतर शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, वटवाघुळांमध्ये कोरोना व्हायरसचा अंश सापडतो.

पण, या व्हायरसची मनुष्याला लागण होण्याची शक्यता कमी आहे. वटवाघुळापेक्षा तो पँगोलिनमार्फत मानवी शरीरात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. चीनकडून करण्यात आलेला हा दावा अजून जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केला नाही.

३० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाच्या ठिकाणी कोरोनाचा धोका कमी

 

Web Title : Corona virus these animal name pangolins may have spread the disease to humans