नियम पाळा , पुण्यात तूर्त लॉकडाऊन नाही, पण…; अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना प्रशासनासाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

मी सर्वांशी चर्चा केली आहे. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही. मी याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्याशी बोललो आहे. सगळे निर्णय एकमताने घेतले आहेत. पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवणार आहे. पुण्यात 50 टक्के बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी कार्यक्रम सर्वच पक्षांनी बंद केले पाहिजेत. लग्न किंवा अंत्यसंस्कारावेळी 50 पेक्षा जास्त संख्या नको,” अशी सूचना अजित पवारांनी केली आहे.

पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

येत्या शुक्रवारी लॉकडाऊन संदर्भात नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या आठवड्यापासून पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच एपीएमसीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील. नागरिकांना धान्य किराणा भरून ठेवण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही- अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER