महापौरांचा इशारा : मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल

Kishori Pednekar

मुंबई : कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेचीच बाब आहे. बहुसंख्य लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे जाऊ. लॉकडाऊन लागू करायचा की नाही, हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पुन्हा लॉकडाऊनचा (Corona Lockdown) इशारा दिला.

प्रसारमाध्यमांशी कोरोनाबाबत बोलताना त्या म्हणालात, मुंबई आणि राज्यात पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसतो आहे. मागील दोन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या बरीच वाढली असून उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढलेल्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या वाढली असून, महापौरांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला.

चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोना चाचणी करण्यात सांगण्यात आले आहे. येथील सर्वाधिक रुग्ण उंच इमारतींमधील आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एका आठवड्यापूर्वी या वॉर्डमध्ये दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र आता हे प्रमाण २५ वर गेले आहे. दिवसाला रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यावर पोहचला असून पालिका अधिकारी यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे होणारे नियमांचे उल्लंघन यासाठी कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. पालिकेने निवासी सदनिकांना नोटीस पाठवली असून कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER