कोरोना : भारतात झाल्या चार कोटींपेक्षा जास्त चाचण्या

Corona virus test

दिल्ली : भारताने आज एकूण चार कोटींपेक्षा अधिक कोरोना चाचण्यांचा टप्पा ओलांडला. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३४ लाखांवर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

एएनआयने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, “भारताने आज चार कोटी कोविड-१९ चाचण्यांचा टप्पा गाठला. आजपर्यंत देशात ४ कोटी ०४ लाख ०६ हजार ६०९ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.”

कोरोनाच्या रुग्णांची गेल्या २४ तासांत आकडेवारी जाहीर करताना आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “देशभरात गेल्या २४ तासांत ७६,४७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १,०२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा एकूण आकडा ३४ लाखांच्या पार – ३४,६३,९७३ झाला आहे. देशात सध्या ७,५२,४२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २६,४८,९७३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. एकूण ६२,५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER