मनसेतर्फे औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पीपीई किट देण्यात आले

MNS provided PPE kit at Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, कोरोना बाधित व संशयित रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ (पीपीई) किटची घाटी रुग्णालयात कमतरता आहे. तर जिल्हा रुग्णालयात अवघे काही दिवस पुरतील इतक्या किट उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी या किट च्या मागणीसाठी सरकारला विनंती करत आहेत.

कोरोना शी लढा देण्याकरता संपूर्ण देश आज प्रयत्न करत आहे. खास करून डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. आज जेथे कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन ज़िल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोसले यांना मनसे तर्फ़े पी.पी.ई कीट सुपूर्त करण्यात आले. या प्रसंगी ज़िल्हा संघटक बिपीन नाईक, उपज़िल्हाध्यक्ष प्रशांत दहिवाडकर, ज़िल्हा संघटक मनीष जोगदंडे हे उपस्थित होते.