लॉकडाऊन : रामदास आठवले यांचा नित्यक्रम कपालभाती, मुलासोबत कॅरम आणि खूप काही

Ramdas Athawale

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतल्यानंतर सामान्य नागरिकांसह सर्वच पक्षांतील मोठे नेते आणि मंत्री घरातूनच काम करताना दिसत आहेत. मात्र कामासोबत ते आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.

रामदास आठवले विभागाचे काम करत असताना आपला मुलगा जीत याच्यासोबत कॅरम, स्नूकरसारखे घरातील खेळ खेळताना दिसून येत आहे. यासोबतच ते सकाळी उठून कपालभाती करताना दिसून येत आहेत. “कपालभाती हा योगाचा प्रकार रोज सकाळी करतो. घरी राहूनच कोरोनाचा मुकाबला करा त्यासाठी घरी योग; प्राणायाम; व्यायाम; आवडते छंद; टीव्ही सोशल मीडिया ; कुटुंबाला वेळ द्या. घरी राहून कोरोनाचा मुकाबला करू या.” असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच शहरातील कबुतरखाना येथे जाऊन कबुतरांना चारा देत असल्याचे दिसून येत आहे.