योग्य काळजी घेतल्याबद्दल लता मंगेशकर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Lata Mangeshkar thanked CM Thackeray

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे ट्विटरवरुन आभार व्यक्त केले आहेत. मंगेशकर कुटुंब राहत असलेली प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रहिवाश्यांच्या विनंतीवरून प्रशासनाने सोसायटी सील केली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून योग्य काळजी घेतली होती. यावरूनच लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही लतादीदींना आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

ही बातमी पण वाचा:- खबरदारी म्हणून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रभुकुंज सोसायटी सील

लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यानंतर सोसायटीतील रहिवाश्यानी केल्या विनंतीनंतर मुंबई महापालिकेने चार दिवसांपूर्वी सील केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी आभार मानले,

“नमस्कार, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे मनापासून आभार. तसेच सीलबंद इमारतींच्या देखभाल व प्रभावी व्यवस्थापनासाठी डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेख.” असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही लता दीदींचे आभार मानले. “आदरणीय दीदी, नेहमीप्रमाणेच निश्चल प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER