देश अंधारातून जात असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तर मूर्खपणा – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad on PM Modi video message ask-to-turn-off-the-lights

मुंबई : कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता मला तुमचे ९ मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून ९ मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं आहे. यापूर्वी मोदी यांनी कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्याच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता थाळ्या आणि टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यावेळीही विरोधकांनी त्यांच्या या आवाहनावर टीका केली होती. आणि आजही त्यांच्यावर टॆकेची झोड उठवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘मी मुर्ख नाही. मी ‘त्या’ दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,” असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केलेल्या आवाहनावर कडाडून टिका केली आहे.

तसेच देश आता अंधारातून जात आहे. वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, तसेच भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. असे मत त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

लोकांची चूल कशी पेटेल असं साहेब बोलतील वाटलं मात्र दिला दिवा पेटवण्याचा संदेश – नवाब मलिक