इराणच्या उपराष्ट्रपती ‘कोरोना’च्या विळख्यात

तेहरान :- कोरोनाने चीननंतर अनेक देशांमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने २ हजार ५०० हून अधिक बळी घेतले आहेत. इराणमध्येही या रोगाचा फैलाव झाला आहे. इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दिल्लीला मिळाले नवीन पोलिस आयुक्त, हिंसाचारात आतापर्यंत ४२ बळी

सध्या जगातील ४८ देशांमध्ये कोरोना पसरला आहे. लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. इराणमध्ये २४५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, कोरोनामुळे येथे २६ बळी गेले आहेत. मासूमेह इब्तिकार या सध्याच्या घडीस इराणमधील सर्वोच्च सत्ता प्राप्त असलेल्या महिला आहेत. इराणच्या इतिहासात असे स्थान मिळविलेल्या त्या आजवरच्या तिसऱ्या महिला आहेत, हे येथे उल्लेखनीय. इब्तिकार यांच्यावर आता उपचार सुरू आहेत.