गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८२ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १,०३९ रुग्णांचा मृत्यू

corona virus

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने २८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२,१७० नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या ६०,७४,७०३ वर पोहचली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. तर १,०३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंची एकूण संख्या ९५,५४२ वर गेली आहे. सध्या भारतात ९,६२,६४० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्याच वेळी कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही ५० लाखांपेक्षा जास्त आहे. आकडेवारीनुसार, गेल्या तीन दिवसांत बरेच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह एकूण ५,०१,६५२१ रुग्ण बरे झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER