सांगलीत सर्वाधिक कोरोना मृत्यूदर : देवेंद्र फडणवीस

Corona Virus- Sangli- Devendra Fadnavis

सांगली : सातारा जिल्ह्याचा (Satara news) दौरा करून विरोधी पक्षनेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. आजूबाजूच्या जिल्ह्यासह राज्यात सांगलीतील कोरोना मृत्यूदर सर्वाधिक (Death rate) असल्याची चिंता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातील सर्वमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासनाने जोमाने प्रयत्न करण्याची गरज फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली तसेच शहरातील रुग्णालयाला ही भेट दिली.

यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सांगलीत इन्फेक्शन रेशो तब्बल साडे सोळा टक्के इतका आहे. त्याहीपेक्षा आणि चार पॉईंट दहा टक्के इतका मोठा मृत्युदर आहे. महाराष्ट्रापेक्षा सर्वाधिक मृत्युदर येथील अधिक आहे. सद्यस्थितीत प्रशासनाने अजूनही मोठ्या प्रमाणात वाचण्याचे प्रमाण वाढवावे, स्लॅब तपासणीसाठी दिल्यानंतर रिपोर्ट येण्यासाठी 48 ते 72 तासांचा अवधी लागतो.

दरम्यानच्या काळात संबंधित रुग्णाला वैद्यकीय उपचारांची गरज असल्यास ती मिळत नाही. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते. अत्यावश्यक रुग्णांना सहा तास फिरूनही बेड उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढल्याशिवाय मृत्यूदर कमी करता येणार नाही. रुग्णांना वैद्यकीय सेवा तात्काळ कशा मिळतील आणि बेडची संख्या वाढविण्याबाबत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. तर हॉस्पिटलचे म्हणणे आहे की त्याचा परतावा मिळत नाही. रेमदेसिविर इंजेक्शन ची किंमत 35 हजार रुपये इतकी आहे.

सरकारच्या सांगण्यानुसार खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना महात्मा फुले योजनेतून या औषधांचा लाभ मिळणार नाही. पूर्वीप्रमाणेच ही औषधे योजनेतून मिळावीत, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER