कोरोनाने चिंता वाढवली, गेल्या 24 तासांत आढळले 6971 नवे कोरोना रुग्ण

Maharashtra Coronavirus

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता गंभीरतेने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता पुढील 15 दिवस महत्त्वाचे असल्याचं प्रशासनाने सांगितलं. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढत आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासांत 2417 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आज 35 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत एकूण 21,00,884 रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 51788 रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच राज्यात आतापर्यंत 19,94,947 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या राज्यात 52,956 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागानं दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER