कोरोनाच्या विषाणूने आयपीएलचे सुरक्षित बायोबबल भेदले, आजचा सामना रद्द?

IPL 2021 Match Postponed

कोरोना (Corona) काळातही आयपीएल 2021(IPL 2021) चे सामने खेळताना भरपूर खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व संघांचे खेळाडू व अधिकारी सुरक्षित बायोबबलमध्ये (Bio bubble) होते, मैदानात प्रेक्षकांना प्रवेश नव्हता, सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जात होते, विविध संघांचे खेळाडू व अधिकारी यांच्या हालचाली ठराविक हाॕटेल ते मैदान एवढ्याच मर्यादीत ठेवण्यात आल्या होत्या. अशा वातावरणात आयपीएल 2021 चे निम्मे सामने व्यवस्थित पार पडल्यावर आता बाॕम्ब फूटला आहे. आयपीएलचे सुरक्षित बायोबबलही कोरोनाने भेदले आहे आणि त्यामुळे सोमवारचा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) व राॕयल चॕलेंजर्स बंगलोर (RCB) दरम्यानचा अहमदाबाद (Ahmedabad) येथील सामना पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. हा सामना कधी व कुठे होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण कोरोना विषाणूने आयपीएल 2021चे आयोजनच आता संकटात आणले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे काही खेळाडू कोरोना पाॕझीटिव्ह आढळून आल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल संचालन मंडळ (IPL Governing Council) काय निर्णय घेते याची प्रतिक्षा आहे. पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग (PSL) काही दिवस स्थगित करण्यात आली आहे तसाच काहीसा निर्णय होईल अशी चिन्हे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार कोलकाता नाईट रायडर्स संघातील एकापेक्षा अधिक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आल्याने राॕयल चॕलेंजर्सने सोमवारचा सामना खेळायला नकार दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवरचा (Narendra Modi Stadium) हा सामना पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे मात्र त्याला बीसीसीआय व आयपीएलकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती व संदीप वाॕरियर हे कोरोना पाॕझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे केकेआरच्या संघातील खेळाडू व अधिकारी आयसोलेशनमध्ये आहेत. त्याआधी पॕटरसन कमिन्स हा बाधित असल्याची अफवा पसरली होती.

प्राप्त माहितीनुसार वरुण चक्रवर्ती हा रितसर परवानगी घेऊन आपल्या खांद्याचे स्कॕनिंग करण्यासाठी बायोबबलच्या बाहेर पडला होता आणि दवाखान्यात गेला होता. कदाचित तिथेच त्याला बाधा झाली असावी असा अंदाज आहे. चक्रवर्ती आणि वाॕरियरशिवाय केकेआरच्या इतर सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचेही वृत्त आहे.

आयपीएलची साथ सुरू झाल्यावर गेल्या जूनपासून इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, आॕस्ट्रेलिया, न्यूझीलंड व बांगलादेशात बायोबबलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे पण पहिल्यांदाच बायोबबल मधील खेळाडूंनासुध्दा बाधा झाल्याचे समोर आले आहे.

आयपीएलच्या गाईडलाईननुसार बाधित व्यक्तीच्या संपर्कातील (close contact) व्यक्तींना किमान सहा दिवस आयसोलेशनमध्ये (Isolation) मध्ये रहावे लागते आणि पहिल्या, तिसऱ्या व सहाव्या दिवसाची त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह यायला हवी. यामुळे आयपीएलमध्ये केकेआरचे पुढचे सामने होणे तरी अवघडच दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button