ऑस्ट्रेलियन ओपनला कोरोनाचा झटका, 72 खेळाडू क्वारंटीन

Corona Virus-- Australian Open 72 players quarantined

कोरोनामूळे (Corona Virus) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस (AO 2021) स्पर्धा गंभीर संकटात सापडली आहे. 8 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळली जाणारआहे पण आताच काही ग्रँड स्लॕम स्पर्धा विजेत्यांसह 72 खेळाडूंना क्वारंटीन (72 players quarantined) करण्यात आले आहे आणि सराव न करताच थेट ग्रँड स्लॕम दर्जाच्या स्पर्धेत कसे खेळायचे असा सवाल आता त्यांनी उपस्थित केला आहे.

मेलबोर्न खेळाडूंसह आलेल्या आणखी एका विमानात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आली आहे. याप्रकारची ही तिसरी फ्लाईट होती त्यामुळे या स्पर्धेवरील संकट अधिक गहिरे झाले आहे. 72 खेळाडूंना आयसोलेशनच्या कडक नियमांमुळे त्यांच्या हाॕटेल रुममध्येच बंदिस्त रहावे लागणार आहे.

ताज्या फ्लाईटमध्ये बहुतेक खेळाडू पात्रता स्पर्धेतून आलेले आहेत. दोहा येथून आलेल्या या फ्लाईटमध्ये असे 25 खेळाडू असून आता त्यांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. त्यात आधीच क्वारंटीन असलेली हिदर वाॕटसनसारखी खेळाडूसुध्दा आहे. आता या सततच्या आयसोलेशनमुळे खेळाडू वैतागले आहेत. काही खेळाडू आता म्हणू लागले आहेत की या कडक नियमावलीची त्यांना माहिती असती तर या स्पर्धेसाठी ते आलेच नसते.मात्र आयोजक म्हणतात की नियम स्पष्ट आहेत आणि स्पर्धा ठरल्याप्रमाणे 8 तारखेलाच सुरु होईल.,

ऑस्ट्रेलियन ओपनने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार 16 तारखेला पहाटे जे विमान दोहा येथुन आले त्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती खेळाडूंच्या पथकातील नाही आणि त्या व्यक्तीचा फ्लाईटच्या आधीचा अहवाल निगेटिव्ह होता. या विमानात 25 खेळाडूंसह 58 प्रवासी होते. याच्याआधी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने आणलेल्यांपैकी तीन जण शनिवारी तर एकाची चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आली आहे,

दोन वेळची विजेती व्हिक्टोरिया अझारेंका, 2016 ची विजेती अँजेलीक कर्बर, माजी युएस ओपन विजेती स्लोन स्टिफन्स व माजी नंबर फोर केई निशीकोरी यांना आयसोलेशनमध्ये रहावे लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER