कोरोना : अदानी समूहाने खरेदी केलेत ४८ क्रायोजेनिक टँक

मुंबई : कोरोना (Corona virus) साथीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसाठी धावाधाव सुरू आहे. अनेक देश आणि देशातील उद्योग समूह मदतीसाठी पुढे आले आहेत. अदानी समूहाने आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. यात समूहातील कर्मचारी व लॉजिस्टिक्सपासून बंदर व विमानतळांचादेखील समावेश आहे.

लिक्विड ऑक्सिजनची (Liquid oxygen) वाहतूक करण्यासाठी अदानीने ४८ क्रायोजेनिक टँकची खरेदी केली आहे. यातून ७८० टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक होऊ शकेल. अदानी समूहाने (Adani Group) सौदी अरब, थायलंड, सिंगापूर, तायवान आणि यूएईकडून हे टँक खरेदी केले आहेत. यातील काही मोठ्या क्रायोजेनिक टँकना गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तर उर्वरित भारतीय वायुदलाच्या मदतीने देशात आणले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button