दिल्ली-एनसीआरसह सहा राज्ये ‘संवेदनशील’ म्हणून घोषित!

मुंबई :- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्राने (Maharashtra) दिल्ली-एनसीआरसह पाच राज्यांना ‘संवेदनशील’ (Sensitive Origin) म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी रविवारी जारी केलेल्या आदेशात केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि उत्तराखंड या सर्व राज्यांना ‘संवेदनशील’ म्हणून घोषित केले. आदेशानुसार, या सहा ठिकाणांहून महाराष्ट्रात रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना ४८ तासांच्या आत आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल दाखवावा लागेल.

कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत रविवारी २४ तासांत २५ हजार ४६२ रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ७५ हजारांवर पोहचली आहे. तसेच २४ तासांत १६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. दरतासाला कोरोनाची २ हजार नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ६८ हजार ६३१ नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्र सरकारने ‘संवेदनशील’ सहा राज्यांतील प्रवाशांसाठी SOP देखील जारी केल्या आहेत. प्रवाशांनी आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल न दिल्यास स्टेशनवरच त्यांची जलद प्रतिजैविक चाचणी घ्यावी लागेल, असेही यात नमूद केले आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button