कोरोना : नव्या रुग्णांचा आकडा झाला कमी; आज आढळलेत २४ हजार १३६

Corona virus

मुंबई :- एप्रिल महिन्यात सतत वेगाने वाढणाऱ्या रुग्णांच्या (Corona patient) संख्येत मे महिन्यात घसरण झाली. मे महिन्याच्या उत्तरार्धात लक्षणीय घट आल्याचे आकडे आहेत. मंगळवारी दिवसभरात राज्यात २४ हजार १३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत रोज ५० ते ६० हजार होता, त्यात निम्म्याने झालेली घट सकारात्मक आणि दिलासादायक आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) गेल्या महिन्यातल्या ८२ टक्क्यांवरून ९२.७६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

६०१ मृत्यू

एकीकडे रुग्णांचा आकडा निम्म्यावर आलेला असताना मृतांचा आकडा मात्र सातत्याने जास्तच आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत ९० हजार ३४९ रुग्णांचा कृतयु झाला आहे.

पुण्यात ७३९ नव्या रुग्णांची नोंद

पुणे शहरात दिवसभरात ७३९ नवे रुग्ण आढळले. रुग्णांची एकूण संख्या आज ४ लाख ६६ हजार ८५८ झाली आहे. आज ३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ हजार ७८ झाली. १ हजार ५६० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४ लाख ४९ हजार ९१२ रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत ३७ मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात १०३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ९९ हजार ९०४ वर गेली आहे. १ हजार ४२७ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. आजपर्यंत बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ५५ हजार ४२५ झाली आहे. दिवसभरात झालेल्या ३७ मृत्यूंमुळे मृतांची संख्या १४ हजार ७०८ झाली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button