शरद पवारांच्या बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

Coronavirus

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीतून दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासात तपासलेल्या ४९८ नमुन्यांपैकी ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील १४ आणि ग्रामीण मधील ३५ रुग्णांचा समावेश आहे. दुस-या लाटेत शुक्रवारी (ता. ४) प्रथमच कोरोनाबाधितांची आकडेवारी दहापेक्षा खाली आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार आता बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वेगाने वाढले आहे. आजपर्यंत २४,५४९ रुग्ण बाधित झाले असून २३,०२८ रुग्ण बरे झाले आहेत. ६२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.ज्या नागरिकांचे दुसरा डोस (कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

आजपर्यंत एकूण रूग्णसंख्या २४ हजार ५१९ वर गेली आहे. तर एकूण बरे झालेले रुग्ण २३ हजार २८ असून आज एकुण ९६ जणांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकॉसिसचे एकूण रुग्ण- २१ आढळले आहेत. पैकी बारामती तालुक्यातील- १४ इतर तालुक्यातील-७ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -७ रुग्ण असल्याचे डॉ खोमणे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button