
औरंगाबाद : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी जळगाव येथील ९० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जळगाव येथे निदान झाले होते. या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादेत संदर्भित करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचार सुरू असताना या रुग्णाने सोमवारी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
ही बातमी पण वाचा:- औरंगाबाद जिल्ह्यात 1301 कोरोनाबाधित आज 16 रुग्णांची वाढ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला