धुळे जिल्ह्यातील वाडी शेवाडी येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

Corona Virus

धुळे: येथील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या वाडी शेवाळे येथील ६७ वर्षीय पुरुषाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज राज्यात नव्या २ हजार ६०८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार १९० वर पोहचली आहे. तर राज्यात आज दिवसभरात ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, १२ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER