आता खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस!

Corona vaccine by Bharat Biotech Company.jpg

दिल्ली :- भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन (Covaxin) या दोन कोरोना लसींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरात सरकारतर्फे मोफत लसीकरण करत आहेत. सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना दिली जात आहे. आता खासगी रुग्णालयांमध्येदेखील कोरोनाची लस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे. यासाठी सरकारने दरदेखील निश्चित केले आहे.

राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोग्यसेवा पुरवणाऱ्या खासगी ठिकाणी (रुग्णालय, क्लिनिक, दवाखाने) कोरोनाची (Corona) लस मिळू शकणार आहे. यासाठी सरकारकडून किंमतदेखील निश्चित करण्यात येईल. सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी लस पूर्णपणे मोफत असेल. तिचा खर्च हा पूर्णपणे सरकारकडून उचलला जाईल.”

लसीची किंमत किती?

दरम्यान, खासगी ठिकाणी दिल्या जाणाऱ्या लसीसाठी २५० रुपये किंमत निश्चित झाल्याचे एएनआयने दिले आहे. या किमतीमध्ये १०० रुपये सेवाशुल्कदेखील समाविष्ट असेल. यासंदर्भात केंद्र सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनीदेखील काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते.

दरम्यान, राजेश भूषण यांनी आजपर्यंत देशात झालेल्या लसीकरणाविषयी यावेळी माहिती दिली. आतापर्यंत देशातल्या ७७ टक्के अर्थात ६६ लाख ३७ हजार ४९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. ७० टक्के अर्थात २२ लाख ४ हजार ८३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER