करोना लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार, आदर पुनावाला यांची माहिती

Adar Ponawaala

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत कोरोना लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. मोदींनी जवळपास 1 तास सीरममधील संशोधकांशी चर्चा केली. यानंतर आता सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली. यावेळी पुनावाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिलं

आदर पुनावाला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. करोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. जगभरातील एकूण लसींपैकी 50-60 टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.यावर त्यांच्याशी सखोल चर्चा झाली.

सध्या भारत सरकार किती लस खरेदी करणार हे मात्र अद्याप निश्चित झालेलं नाही. आम्ही पुढील 2 आठवड्यात तात्काळ परवान्यासाठी देखील अर्ज करणार आहोत. करोना लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार, नंतर जगभरातील कोव्हॅक्स इतर देशांमध्ये वितरण होईल. आदर पुनावाला यांनी यावेळी भारतात कोरोना लस साठवण्यासाठीच्या सुविधांवरही भाष्य केलं. ते म्हणाले , भारतात 1 किंवा 2 डिग्री सेल्सीयस तापमानावर साठवण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, उणे 20 डिग्री सेल्सीअस तापमानासाठी मात्र आपल्याकडे कमी सुविधा आहेत.

सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणारही एक उत्तम लस असून ही लस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. तसेच ही लस रुग्णाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या 60 टक्के विषाणूंना रोखते, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER